दुर्लक्षित असलेल्या स्किईंग क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविणाऱ्या आंचल ठाकूर हिने ‘किमान या पदकानंतर तरी सरकारचा ‘विंटर स्पोर्ट्स’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय हिवाळी गेम्स महासंघाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसल्याकडे देखील तिने लक्ष वेधले. आंचलने तुर्कस्तान येथे झालेल्या स्किईंगच्या ‘एल्पाईन एजर ३२००’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्लालम या स्पर्धा प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews